बातमी बळीराजाची
वर्ध्यातील आष्टी तालुक्यात मोसंबी फळांवर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांची चिंता वाढली
पावसामुळे आष्टी तालुक्यातील मोसंबी बागायतदारांना फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
भूपेश बारंगे, वर्धा
पावसामुळे आष्टी तालुक्यातील मोसंबी बागायतदारांना फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. आष्टी तालुक्यातील साहूर परिसरात दहा ते 15 गावातील शेतात मोसंबी गळती सुरू आहे. आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबी बागायतदार आहे.
सततच्या पावसामुळे मोसंबी फळ गळती झाली यात सात ते आठ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. मोसंबी फळांवर रोगांचा पादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याकडे कृषी, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात असून शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.