Ganpati Visarjan: पुण्यात पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन पडलं पार

Ganpati Visarjan: पुण्यात पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन पडलं पार

आज गणरायाचा विसर्जन सोहळा ज्या लाडक्या बाप्पाला 10 दिवस आल्या घरात आणि मंडपात मोठ्या जल्लोषात आणलं त्या बाप्पाला आज अखेर निरोप देण्याची वेळ आली आहे.
Published on

आज गणरायाचा विसर्जन सोहळा ज्या लाडक्या बाप्पाला 10 दिवस आल्या घरात आणि मंडपात मोठ्या जल्लोषात आणलं त्या बाप्पाला आज अखेर निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईसोबतच पुण्यात ही मानाचे 5 गणपती आहेत. त्यातील पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्याा कसबा गणपतीचं विसर्जन पार पाडलं आहे. पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीला आज निरोप देण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. पुण्यात ढोल ताशांच्या नगाड्यात बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन म्हणजे कसबा गणपतीचे विसर्जन संध्याकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान झाले आहे. भाविकांकडून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करतं बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. डोळ्यात बाप्पाला निरोप देताना अश्रू साठवत भाविकांकडून निरोप देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com