गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर आला आहे. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बाप्पाची आतुरतेनं वाट बघत आहेत.
मोठ्या मोठ्या गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी बाजारपेठ सज्ज झाली असून, भाविकांचीही खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू मखरासाठी लागणारे साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत असून सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहेत.
मोठ्या प्रमाणत मकर खरेदील मागणी आहे. बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू, मकरासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे.