Sangali: सांगलीत कृष्णा नदी काठावर पार पडली गौराईची पूजा, गणरायानंतर आता गौराईचे थाटामाटात स्वागत
गणराची स्थापना प्रत्येक घराघरात झालेली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी प्रत्येक ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली होती. आपल्या लाडक्या गौराईला आपल्या घरी प्रतिष्ठापित करण्यासाठी महिलांनी गौराईचे थाटामाटात स्वागत केले आहे. आता गौरीच्या आगमनाच्या तयारीसाठी भाविक लागले आहे. आज गौराईला पूजून महिला गौराईला आपल्या घरात आणार असून उद्या तिची स्थापना बाप्पाच्या शेजारी केली जाणार आहे. तर तिला वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य देत तिचा पाहूणचार केला जाणार आहे. त्यानंतर रात्री मबिला गौराईसमोर खेळ खेळतात आणि तिचं स्वागत करतात.
सांगलीमध्ये आज मोठ्या थाटामाटात मध्ये गौराईचा आगमन झाले. सकाळी सुवासिनी महिलांनी सांगलीताल कृष्णा नदी काठावर गौराईचे पूजन करत तिथेच झिम्मा फुगडी चा फेरा धरला आणि आली गवर आली सोन पावले आली म्हणत महिला गौराईच्या आगमनात मग्न झालेल्या दिसून आल्या. नदीवरून वाजत गाजत अनेक महिलांनी आपापल्या घरी गौराईची प्रतिष्ठापना केली आहे. पुढील दोन दिवस घरोघरी या गौराईची मनोभावी पूजाअर्चा करून गौराईचा पाहुणचार केला जातो. आज भाजी भाकरीचा नैवेद गौराईला दाखवला जातो. तर उद्या पुरणपोळीचा निवेदन दाखवून गौराईचा पाहुणचार केला जातो. त्याचबरोबर गौराई घरी आल्यानंतर तिला प्रसन्न वाटावे म्हणून तिच्यासमोर गौराईची गीते सादर करीत महिला झिम्मा फुगडी खेळतात.