Navratri 2024: नवरात्रीत पहिल्यांदा देवीची ओटी भरताय! जाणून घ्या देवीची ओटी कशी भरावी...
हिंदू धर्मात गणपती, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्याप्रकारे महत्त्व आहे त्याच प्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातस्या स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशआचीच कमी पडू देत नाही.
तसेच नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते. ही ओटी विवाहित स्त्रीया भरतात असं म्हणटलं जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्त्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्त्वाचा सन्मान करणे. यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते. मात्र तुमची ही लग्नानंतर पहिली नवरात्र असेल आणि तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी ते पुढील प्रमाणे जाणून घ्या...
ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी, नारळ आणि खण. देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्या ऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा याप्रकारचे शुभ्र रंगाची साडी निवडा लाल, हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो, त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगांची साडी निवडा. एका ताटात साडी ठेवा आणि त्याचसोबत खण, नारळ, अखंड सुपारी तसेच हळद-कुंकु, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडी साखर देखील ठेवावी. ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा.
पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल. इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी दोवीसमोर घेऊन जा आणि देवी समोर उभे राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या. ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ वाहा आणि देवीला प्रार्थना करा.