नवरात्री 2024
Saptshrungi Mata: सप्तश्रृंगी मातेच्या चरणी तब्बल इतक्या महिलांना घडवले देवीचे दर्शन
नवरात्र जवळ आली आहे त्यादरम्यान महाराष्ट्रातील जी साडे तीन देवीची शक्तीपीठे आहेत. त्या प्रत्येक शक्तीपीठावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
नवरात्र जवळ आली आहे त्यादरम्यान महाराष्ट्रातील जी साडे तीन देवीची शक्तीपीठे आहेत. त्या प्रत्येक शक्तीपीठावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या निमित्ताने मनसे नेत बाळा नांदगांवकर सप्तश्रृंगी मातेच्या चरणी लीन झाले आहेत. तसेच बाळा नांदगांवकर यांनी साडे तीन हजार महिलांना देखील देवीचे दर्शन घडवलं आहे त्याबद्दल महिलांनी बाळा नांदगांवकर यांचे आभार देखील मानलेले आहेत.
याचपार्श्वभूमीवर बाळा नांदगांवकर म्हणाले की, सप्तश्रृंगी देवीने त्यांना बोलवलं आहे. मला आनंद आहे या निमित्ताने माझ्या सर्व माता बहिणींना देवीचे दर्शन घेता आले आणि त्या खुश आहेत.