Daily Horoscope  : 'या' राशीला धन लाभ होण्याची शक्यता; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope : 'या' राशीला धन लाभ होण्याची शक्यता; पाहा तुमचे भविष्य

Rashi Bhavishya 09 Feb 2026: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मेष (Aries Horoscope Today) : खर्चांवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू पाहायला मिळेल. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.

वृषभ (Taurus Horoscope Today) : विश्रांती अत्यंत गरजेची. आर्थिक लाभ होतील. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. जोडीदार आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.

मिथुन (Gemini Horoscope Today) : कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू पाहायला मिळेल. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो.

कर्क (Cancer Horoscope Today) : आर्थिक लाभ होतील. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

सिंह (Leo Horoscope Today) : धन लाभ होण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता. व्यवसायात आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

कन्या (Virgo Horoscope Today) : पैशांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. वैवाहिक आयुष्यात रोमँटिक वातावरण असणार आहे.

तूळ (Libra Horoscope Today) : आर्थिक चणणच जाणवेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका. जोडीदारासोबत वादाची शक्यता. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकते.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अश्या जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुमचा/तुमची जोडीदार सॅकेरिनपेक्षाही गोड आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल. कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.

मकर (Capricorn Horoscope Today) : व्यापारात नफा होईल. घरातील प्रलंबित कामं तुमचा बराच वेळ खातील. संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : खर्चांवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल.फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. जोडीदार तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

मीन (Pisces Horoscope Today) : धन हानी होऊ शकते. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com