Daily Horoscope  : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता; पाहा तुमचे भविष्य

Rashi Bhavishya 10 Feb 2026: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मेष (Aries Horoscope)

आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रीया सारखा घटना संभवतात.

वृषभ (Taurus Horoscope)

व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे.

मिथुन (Gemini Horoscope)

नोकरीत अतिउत्साही आणि अतिरेकपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी.

कर्क (Cancer Horoscope)

स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.

सिंह (Leo Horoscope)

आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.

कन्या (Virgo Horoscope)

कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील.

तूळ (Libra Horoscope)

फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनमनानाची गोडी वाढेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मनोधैर्य कमालीचे उचांवलेले असेल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा.

धनु (Sagittarius Horoscope)

भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn Horoscope)

आपली इच्छापूर्ती व प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील.विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल.

मीन (Pisces Horoscope)

गुरूस्वराशीत असल्याने देव आणि धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com