Horoscope 17 Feb 2026
Horoscope 17 Feb 2026

Daily Horoscope : 'या' राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल, वाचा आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 17 Feb 2026: आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशी भविष्य.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मेष (Aries Horoscope)

उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल.

वृषभ (Taurus Horoscope)

तिखट पदार्थांचे सेवन करू नका. व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा.

मिथुन (Gemini Horoscope)

आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. दिवस उत्साहात जाईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा.

कर्क (Cancer Horoscope)

नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल.

सिंह (Leo Horoscope)

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल.

कन्या (Virgo Horoscope)

घरासाठी नवीन खरेदी कराल. स्पर्धेत यश मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

तूळ (Libra Horoscope)

नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

धनु (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल.

मकर (Capricorn Horoscope)

कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका.

कुंभ (Aquarius Horoscope)

महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल.

मीन (Pisces Horoscope)

हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. न पटणार्‍या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com