भाईंदर पश्चिम परिसरात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या, गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव शांततेत आणि मोठ्या सहभागाने पार पडावा, यासाठी राज्य सरकारने संबंधित मतदान क्षेत्रांमध्ये 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी पुरेसा वेळ मिळणार असून मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये घडलेल्या एका वादग्रस्त घटनेची बातमी लोकशाहीने उघडकीस आणल्यानंतर राज्य पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी घेतली असून, त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अचानक आणि गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान संबंधित घटनेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आल्याचे समजते.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते अविनाश जाधव यांनी ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या, 14 जानेवारी रोजी तातडीची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.अविनाश जाधव यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की, अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारे प्रकार घडले आहेत. दबाव, धमक्या, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय त्रुटींमुळे काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधीच मिळत नसून, ही बाब लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला असून, शिवसेना (ठाकरे गट)चे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाने आजच्या अग्रलेखातून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. सामनाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर “वडापाव आणि झुणका-भाकरीचा द्वेष” असल्याचा आरोप करत, हे वक्तव्य मराठी माणसाच्या कष्ट, रोजगार आणि स्वाभिमानाचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळत असताना मुख्यमंत्री रोजगार देण्याच्या घोषणा करत आहेत, मात्र प्रत्यक्षात हजारो तरुणांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या वडापाव उद्योगाला कमी लेखले जात आहे. वडापाव हा केवळ खाद्यपदार्थ नसून, मुंबईतील कष्टकरी, कामगार आणि तरुणांसाठी रोजगाराचे मोठे साधन असल्याचा दावा सामनाने केला आहे. मराठी माणसाचा वडापाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असताना, त्याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्याची खिल्ली उडवली जात असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
राज्यातील सिंचन प्रकल्पांतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन शिवसेना–भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. युती सरकारच्या काळात अनेक सिंचन प्रकल्पांच्या किंमती अनाकलनीयरीत्या वाढवण्यात आल्या, असा गंभीर आरोप करत अजित पवारांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. “आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या काळातील निर्णयांचा हिशेब द्यावा,” असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की, सिंचन प्रकल्प हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट जोडलेले असून, त्यामध्ये झालेली कोणतीही अनियमितता गंभीर बाब आहे. मात्र, ज्या काळात शिवसेना–भाजप युती सत्तेत होती, त्या काळात अनेक प्रकल्पांच्या मूळ अंदाजपत्रकात मोठी वाढ झाली. काही प्रकल्पांची किंमत दुप्पट, तर काहींची तिप्पट करण्यात आली. या वाढीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Tuljabhavani Temple मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संक्रांतीनिमित्त ओवसण्यासाठी मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड असल्याशिवाय महिलांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दिल्लीतील कर्तव्य पथावर २०२६ च्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य संचलनाची रंगीत तालीम सुरू झाली असून, देशभरातील नागरिकांचे लक्ष या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागले आहे. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही रंगीत तालीम अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे. या तालीममध्ये भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचा—थलसेना, नौदल आणि वायुसेना, तसेच निमलष्करी दलांचे तुकडी संचलन पाहायला मिळत आहे. देशाच्या संरक्षण सामर्थ्याचे दर्शन घडवणारी ही तालीम राष्ट्राच्या शौर्याची आणि सैन्याच्या शिस्तीची साक्ष देत आहे. आधुनिक शस्त्रसज्जता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जवानांचे समन्वयपूर्ण संचलन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत असून, ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून हवामानाचा पॅटर्न बदलला असून, अनेक भागांमध्ये पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, थंडी अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगांची गर्दी वाढत असून, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमानही अपेक्षेपेक्षा जास्त राहात आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा मोठा अलर्ट देण्यात आला असला तरी, त्या शीतलहरी पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचत नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे जाणवत आहे.
नाशिकच्या त्र्यंबकरोडवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होणं सुरू झालं आहे. त्यामुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी काही वाहतूक बदल घडवून आणले आहेत. 13 ते 16 जानेवारी दरम्यान यात्रोत्सव साजरा होणार असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने रस्त्यावर काम सुरू केलं आहे. मुख्य रस्त्यांवर काँक्रिटीकरण, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाहतुकीला एकेरी बनवण्यात आलं आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचारसभांचा जोरदार सामना पाहायला मिळत आहे. “पालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी?” हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने प्रचारात आक्रमक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकांसाठी तब्बल 33 प्रचारसभा घेतल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 सभा घेत आपली ताकद दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते अजित पवार यांनीही 25 प्रचारसभा घेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. या तिन्ही नेत्यांच्या सभांमुळे महायुतीचा प्रचार अधिक आक्रमक आणि प्रभावी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेमुळे शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १४ ते १६ जानेवारीदरम्यान सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काही महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मतदानाच्या दिवशी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील विविध भागांत प्रवेशावर मर्यादा असतील. विशेषतः जड वाहनांना काही परिसरात परवानगी नसेल.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांची संपूर्ण प्रशासकीय आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात किमान एक ‘गुलाबी सखी’ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संपूर्ण व्यवस्थापन महिलांकडून करण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, निवडणूक कर्मचारी आणि मतदान अधिकारी सर्व महिला असतील. महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह वातावरण मिळावे, या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणास्तव मोबाईल नेल्यास तो पूर्णपणे स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक असेल. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी हे नियम काटेकोरपणे राबवले जाणार आहेत.
मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे सेवा दिवस-रात्र अविरत धावत असते. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तीन प्रमुख मार्गांवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. कार्यालयीन कामासाठी जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणारे नागरिक या लोकल सेवेवर अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. मात्र हार्बर मार्गावरील प्रवाशांना आजवर या सुविधेपासून वंचित राहावे लागले होते.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन येथे अतिक्रमण नियमानुकूल झालेल्या 21 लाभार्थ्यांना शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासनाचा उद्देश प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा असल्याचे स्पष्ट केले. सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असून, पट्टे मिळालेल्या नागरिकांना घरकुलासाठी अर्ज केल्यास तत्काळ मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पांदण रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई
--
अतिक्रमण कारवाईविरोधात शेतकरी आक्रमक
--
संतप्त शेतकरी अरुण चिंचोरियांनी मारली विहीरीत उडी
--
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीनिमित्त खंडोबा देवाला तिळाच्या दागिन्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.संक्रांतीचे औचित्य साधून जेजुरी गडावरील खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तींना तिळापासून बनवलेले विशेष दागिने परिधान करण्यात आले होते.यामध्ये मुकुट, हार, बाशिंग आणि इतर अलंकारांचा समावेश होता.पांढऱ्याशुभ्र तिळाची ही सजावट देवाच्या मूर्तीवर अत्यंत देखणी दिसत होती.
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सज्ज करण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी दि 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे, मतदान प्रक्रियेची पूर्व तयारी म्हणून प्रभागा प्रमाणे ईव्हीएम मशीन सज्ज करण्याच्या तयारीला कर्मचारी, अधिकारी सज्ज झाले आहेत,
कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांच्यावर अत्याचार करणारे आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्याचे कृषिमंत्री १ रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर खदान पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात विनयभंगासह विविध गुन्हे दाखल केले आहेत. पीडित महिलेचे लग्न २५ मे २०२५ रोजी झाले असून, लग्नानंतर सासरी नांदत असताना सासरे सुभाष तायडे यांनी वारंवार वाईट उद्देशाने अंगाला स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच जेठ शुभम याने अश्लील शेरे, त्रासदायक नजर आणि अवांछित वर्तन केल्याचेही नमूद आहे.
-मनमाड -चांदवड मार्गांवर सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात ट्रक खाली दबून आई आणि तीचे 4 आणि 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू असून
इतर 4 जण जखमी गंभीर जखमी झाले त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असल्याचे समजते..
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी जिल्ह्यात 23 लाख 40 हजार 199 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 11 लाख 87 हजार 203 पुरुष तर 11 लाख 52 हजार 909 महिला आहेत तर 87 इतर मतदारांचा समावेश आहे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्याने प्रशासनाचे कामाचा युद्धपातीवर सुरू आहे
.'50 टक्के पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव'..'मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करु नये'...'फडणवीसांना का पोटात दुखतंय?'
बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची आज मकर संक्रमणानिमित्त निमित्त विशेष अलंकारिक महापूजा करण्यात आली आहे.यामध्ये वैद्यनाथाला आज चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले असून यामुळे प्रभू वैद्यनाथाचे मोहक स्वरूप पाहायला मिळत आहे.अलंकारिक महापूजामुळे आज सायंकाळचे प्रभु वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन बंद असणार आहे.अलंकारिक पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात दिसून आलीये.
निवडणुकीवरून दोन गटात तुफान हाणामारी
छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातील घटना
दोन उमेदवारांचे समर्थक आमने- सामने
दोन-तीन गंभीर जखमी
सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे.शहरातल्या प्रभाग 10 मधील वडर कॉलनी येथील भाजपा कार्यकर्ते असणारे शेखर कलगुटगी यांच्या घरावर अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारासही दगडफेक करण्यात आली आहे.ज्यामुळे कलगुटगी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात नवी मुंबईतील वातावरण चांगलंच तापलंय... काल रात्री अडीच च्या सुमारास भाजपा आणि शिंदे सेनेत हाणामारी झाल्याची घटना घडलीय... विशेष म्हणजे माजी महापौर सागर नाईक यांच्या समोर हा सर्व घडलाय.... त्यावेळी तेथे उपस्थित पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करून दोनही गटांना बाजूला करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय...