आज मुंबईत 21 व्या टाटा मॅरेथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मधून 69 हजार हून अधिक धावपटू सहभागी झालेत.
अजित पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेणार आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली असून दोन दिवसात 2300 हून अधिक अर्जाची विक्री झाली.
छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली असून जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार?
ताज लॅण्ड्समधील राऊतांच्या भोजनास्त्रला शिंदे प्रतिसाद देणार?
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेनेला हवंय महापौरपद
मुंबईच्या राजकारणात आणखी एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता
एकनाथ शिंदेचे सर्व नगरसेवक ताज लॅण्ड्स हॉटेलमध्ये मुक्कामी
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
झ्युरिक मधील लाडक्या बहिणींनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागत
भरधाव कार घुसली थेट चिकनच्या दुकानात..
शहा दावल बाबा दर्ग्याजवळील घटना...
अपघातात कार चालक जखमी
अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
धुळे महापालिका निवडणुकीच्या निकालात एमआयएमने यंदा मोठी झेप घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. २०१८ च्या निवडणुकीत एमआयएमचे एकूण 4
उमेदवार निवडून आले होते. मात्र यावेळी पक्षाने आपली ताकद दुपटीहून अधिक वाढवत तब्बल १० जागांवर विजय मिळवला असून महापालिकेच्या सभागृहात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.
एमआयएमच्या या यशामागे पक्षाने राबवलेली व्यापक निवडणूक रणनीती महत्त्वाची ठरल्याचे दिसून येते.
२०२४ च्या सिल्लोड–सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याचा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी केला आहे. याप्रकरणी सी-विजिल ॲप व निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याने सिल्लोड न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व अन्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
बार्शीचे आमदार दिलीप सोपल अजित पवारांच्या भेटीला
मात्र भेटीचं कारण अस्पष्ट
*पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग २५ मध्ये लागलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करणार दाखल*
*रूपाली ठोंबरे यांच्याकडून उच्च न्यायालयात रीट याचिका*
*निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शकपणे झाला नसल्याचा आरोप*
*पुण्यातील प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई प्रभागातून रूपाली ठोंबरे झाल्या होत्या पराभूत*
20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेले व पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय पाटील गोर्डे हे भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारा हा प्रवेश पैठणच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे. गोर्डे यांनी यापूर्वी उबाठाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. चिकलठाणा येथील भाजप कार्यालयात रावसाहेब दानवे व आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला तालुक्यात बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.....
चिपळूण..चिपळूण मधील भाजप पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम यांनी एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिला धमकी देऊन जबरदस्तीने तिच्यावर वारंवार लैंगिक शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केले त्याबद्दल पीडित अल्पवयीन बालिका हिच्या तक्रारी नुसर त्याच्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्यस्थितीत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
* देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट..
* राजनाथ सिंह आज नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी गडकरींच्या निवासस्थानी भेट दिली..
कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
नितीन नबिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार
भाजपातील उच्चपदस्थ सूत्रांची माहिती
निवड प्रक्रियेच्या पुर्ततेसाठी विविध राज्यातील महत्त्वपूर्ण नेते दिल्लीत दाखल
महाराष्ट्र भाजपचे नेतेही उद्या आणि परवा दिल्लीत असणार
ढगा व राहटी या दोन गेटचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून असलेल्या प्रकल्पाला आता जंगल सफारी साठी चार गेट
बोर व्याघ्र प्रकल्प खुणावतोय पर्यटकांना
बोर व्याघ्र प्रकल्पात वाघासह अस्वल बिबटे हरिण काळवीट व विविध प्राण्यांचे होत आहेत पर्यटकांना दर्शन
या
नवीन दोन गेट सुरू झाल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार, पालकमंत्री पंकज भोयर
उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर खासदार अमर काळे आमदार सुमित वानखेडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच आज खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र, या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रात उमटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.