Latest Marathi News Update live : सिंधुदुर्गातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी

Marathi Live Headlines Updates: आज शनिवार, दिनांक 0३ जानेवारी 2026, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी इचलकरंजी दौऱ्यावर

आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात..इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती उमेदवारांच्या प्रचार प्रारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वस्त्रनगरीत येत आहेत. आज शनिवारी दुपारी २ वाजता मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे, आज दुपारी 2 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळून देवेन्द्र फडणवीस यांचा रोड शो सुरु होईल. त्यानंतर शिवतीर्थ, शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक या मार्गावर हा रोड शो होणार आहे. त्याच ठिकाणी या रोड शोची सांगत होणार आहे.

Mahayuti : आज मुंबईत महायुतीची पहिली तोफ धडाडणार; प्रचाराचा भव्य शुभारंभ वरळीतील NSCI डोममध्ये

मुंबईतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, आज महायुतीकडून निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती आज मुंबईत आपली पहिली प्रचारसभा घेणार असून, या सभेमुळे राजकीय रणधुमाळीला औपचारिक प्रारंभ होणार आहे. वरळी येथील NSCI डोममध्ये होणाऱ्या या भव्य सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : फडणवीस सरकारची लाखो शेतकऱ्यांना नववर्षाची मोठी भेट...

नववर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

Maharashtra Municipal Elections : महापालिका निवडणूक; आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार

( Maharashtra Municipal Elections) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. काल अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Uday Samant : पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ; उदय सामंतांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात होणार

(Eknath Shinde) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसेनेच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ होणार असून उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात होणार आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 9 जानेवारीला भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.

Election Duty : मयत शिक्षकांना निवडणूक ड्युटी; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर शिक्षक संघटना संतापली

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दोन मयत शिक्षकांना निवडणूक ड्युटीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे शिक्षक वर्गात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाच्या गोंधळलेल्या कारभारावर जोरदार टीका होत आहे. निवडणूक कामकाजासाठी गैरहजर राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, याच प्रक्रियेत दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावावर ड्युटी लावण्यात आली आणि त्यांना गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Ravindra Chavan : कोल्हापूरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ 

(Ravindra Chavan) 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार असून शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे.

Invest Maharashtra : राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी सरकारचं मोठं पाऊल .... नवीन उद्योग धोरणात ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’सह ‘कंट्री डेस्क’ची घोषणा

महाराष्ट्र सरकारने राज्याची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर वर पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी उद्देश ठरविला आहे. यासाठी थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणे अनिवार्य असल्याचे सरकारने सांगितले आहे. या उद्देशाने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणमध्ये ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल मंचाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच जागतिक पातळीवरील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी ‘कंट्री डेस्क’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gold-Silver Price Update : सोन्या – चांदीच्या दराने पुन्हा घेतली झेप; 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

भारताच्या सोन्या आणि चांदीच्या बाजारात 3 जानेवारी रोजी किंमतीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यामुळे सोन्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना नवीन दर लक्षात ठेवणे गरजेचे ठरले आहे. हवामानाच्या अस्थिरतेसह जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 13,621 रुपये झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 12,486 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 10,216 रुपये नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,24,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,36,210 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,02,160 रुपये आहे.

Ladki Bahin Yojana : ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा, रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा...

ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या नियोजनाअभावी लाडक्या बहिणींच्या आर्थिक अपेक्षा अधोगती झाल्या आहेत. सरकारच्या सामाजिक कल्याण योजनेअंतर्गत राखीव हप्त्यांचे वितरण वेळेवर न होण्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दोन महिन्यांचे रखडलेले हप्ते अद्याप बँक खात्यांमध्ये जमा झालेले नसताना, फक्त नोव्हेंबरचा हप्ता १५०० रुपये बुधवारी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते मिळून ४५०० रुपये जमा होण्याची अपेक्षा होती, मात्र केवळ नोव्हेंबरच्या हप्त्यामुळे अनेक महिला आर्थिक दृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. या विलंबामुळे घरगुती खर्च, बालवाढीशी संबंधित गरजा आणि इतर मूलभूत खर्च भागवणे अवघड झाले आहे.

Thackeray Brothers : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची 'या' तारखेला संयुक्त मुलाखत

(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत होणार आहे.

Ajit Pawar : पिंपरी चिंचवड नंतर अजित पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद

पिंपरी चिंचवडनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. आज संध्याकाळी ठीक पाच वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार असून, पुण्यातील भाजपच्या कारभारावर अजित पवार स्पष्ट आणि थेट भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवडमधील घडामोडीनंतर अजित पवार काय खुलासे करणार, भाजपवर नेमके कोणते आरोप करणार आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत काय संकेत देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुण्यातील राजकीय वातावरण तापणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार बाबुराव चांदेरेंच्या मुलावर गुन्हा दाखल

किरण चांदेरे हा बाबुराव चांदेरे यांचा मुलगा

मतदारसंघात मतदारांच्या याद्या दिल्याने गुन्हा दाखल

मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेरमध्ये गुन्हा दाखल

चांदेरेंच्या मुलासह इतर 14 जणांवर गुन्हा दाखल

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत होणार

6 जानेवारीला संयुक्त मुलाखत होणार

संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार मुलाखत

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार मुलाखत

ठाकरे बंधूंची प्रथमच संयुक्त मुलाखत होणार

उदय सामंत यांच्याकडून रविंद्र धंगेकर यांचा फायर ब्रँड म्हणून उल्लेख

शिवसेनेला विश्वासात घेऊनच पुण्याचा महापौर बनवावा लागेल

सगळीकडे वातावरण बघितले तर शिवसेनेला पाठिंबा देयच असा वातावरण दिसत आहे

आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही

आपले सगळं काम अजित पवार करत आहेत

शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती

असा सामना हा पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये होतोय

आम्ही कुठल्या पक्षाच नाव घेतल नाही

शिवसेनेला संघर्ष हा पुजलेला आहे

Wardha: वर्ध्याच्या हिंगणघाट येनोरा रोडवरील जलाराम जिनिंगला भीषण आग

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील येनोरा रोडवर असलेल्या जलाराम जिनिंग कारखान्यात आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

ही आग सरकी व बारदाने साठवून ठेवलेल्या गोदामात लागल्याची माहिती असून आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे.

या आगीत जिनिंग मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Virar: विरार पूर्वेला भाजपला मोठा धक्का

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा बविआमध्ये पक्षप्रवेश

तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्ते बविआमध्ये

पक्षाने स्वतः दुर्लक्ष केल्याने पदाधिकारी नाराज

बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात पक्षप्रवेश

BVA: बविआचा कट्टर कार्यकर्ता भाजपात

- रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनीष राऊत व कुटुंबीयांचा भाजपात पक्षप्रवेश

- बविआच्या २५ वर्ष जुन्या कट्टर कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

- बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ता तिकीट कापल्यामुळे नाराज असल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे

Pune: 'पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या'

वानवडी साळुंखे विहार प्रभागाचे काँग्रेसच्या उमेदवार प्रशांत जगताप यांनी प्रभागातील वाहतूक समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे असं सांगितलं आहे.. प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या होत आहे गेल्या नऊ वर्षापासून भाजपचं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे पण वाहतुकीची समस्या सोडवण्यास अपयशी ठरले आहेत

Yavatmal: यवतमाळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा वाद चिघळला

सावित्रीबाई फुले पुतळा समिती ने पुन्हा एकदा त्याच जागेवर स्थापन केली सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा

उचलून नेलेला पुतळा पुन्हा या ठिकाणी लावण्यात आला नाही तर आंदोलन करण्याचा दिला ईशारा

नगर परिषद प्रशासन चा केला निषेध

परवानगी असून पुतळा का हटविण्यात आला असा केला सवाल

काल रात्री सावित्रीबाई फुले यांचा पुतळा कुठलाही आदेश न दाखवता हटविला होता

मुंबई पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी समिती गठित

नागपूर अधिवेशनात झाली होती बैठक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सूचनेनुसार समिती गठीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते समिती गठीत करण्याचे आश्वासन

गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

एकूण ८ सदस्यीय समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार

धोरणातील निर्णयासाठी समिती सर्व कायदेशीर व आर्थिक बाबी तपासणार

मुंबई पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाला वेग

Vashi: तानाजी सावंतांचा वाशी तालुक्यात विजय संकल्प मेळावा

जिल्हा परिषदेचे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकले

धाराशिवमध्ये तानाजी सावंत मोठ्या ताकतीने जिल्हापरिषद मैनादात

तानाजी सावंत यांचा वाशी तालुक्यात विजय संकल्प मेळावा, मेळाव्यासाठी दीड ते दोन हजार गाड्या; हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मेळाव्यासाठी दाखल

तेरणा कारखान्यावर दुसरा विजय संकल्प मेळावा घेणार ,

साखर कारखान्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तानाजी सावंत यांच्याकडून साखर पेरणी

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत.

किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ८ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

मुंबई पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी समिती गठीत

नागपूर अधिवेशनात झाली होती बैठक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सूचनेनुसार समिती गठीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते समिती गठीत करण्याचे आश्वासन

गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

एकूण ८ सदस्यीय समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार

धोरणातील निर्णयासाठी समिती सर्व कायदेशीर व आर्थिक बाबी तपासणार

मुंबई पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाला वेग

भिवंडीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भिवंडीत पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी ...

भंडारी चौक नारपोली येथील वॉर्ड क्रमांक २० मध्ये भाजपा उमेदवार यशवंत टावरे व काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय रस्त्यात समोर समोर आहेत.

सायंकाळी काँग्रेस उमेदवार रॅली घेऊन भाजपा कार्यालय समोर घेऊन येत घोषणाबाजी करू लागल्याने वादंग ...

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक व काठ्यांचा मारा केला .यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com