हिंदुस्तान भाऊच्या चिथावणीनंतर विद्यार्थी रस्त्यावर…, पोलिसांकडून भाऊचा शोध सूरू
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले आहे. ऑफलाईन परीक्षेला कडाडून विरोध करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले आहे.दरम्यान हिंदुस्तान भाऊच्या हिंदुस्तानी भाऊचे म्हणजेच विकास पाठक याच्या चिथावणीनंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पोलीस हिंदुस्तान भाऊच्या मागावर आहेत.
हिंदुस्तान भाऊने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे की, शिक्षणमंत्र्यांना आवाहन आहे की, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी परीक्षा रदद् करा. नाहीतर मी लाखो विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेन असा इशार त्याने प्रशासनाला दिला. आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावर जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल,असे त्यांनी म्हटले होते.
या व्हिडीओ विद्यार्थी आक्रमक झाले होते. आणि वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.