ajit pawar
Vidhansabha Election
नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरणार; म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 4 वाजता टाटा नगर, पाचनळ, गोवंडी येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजप कडून नवाब मलिक यांना विरोध केला जात आहे मात्र आता अजित पवार आज स्वतः नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, आम्ही त्यांना उमेदवारी दिली ना. घड्याळ्याचे चिन्ह दिलंय ना. आम्ही त्यामध्ये जाणारच ना. अजूपर्यंत नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले. आरोप सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही गोष्टी कशा ठरवता. असे अजित पवार म्हणाले.