Horoscope 
राशीभविष्य

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल.

वृषभ (Taurus Horoscope)

कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.

मिथुन (Gemini Horoscope)

आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा.

कर्क (Cancer Horoscope)

आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह (Leo Horoscope)

मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या (Virgo Horoscope)

व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ (Libra Horoscope)

आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. कामातून समाधान लाभेल.

धनु (Sagittarius Horoscope)

जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर (Capricorn Horoscope)

लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ (Aquarius Horoscope)

भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन (Pisces Horoscope)

स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल. काहीशी मानसिक शांतता लाभेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

'या' नेत्याच्या घरी मटण पार्टीचे आयोजन; थेट फडणवीसांना आमंत्रण, नेमकं प्रकरण काय?

Shivsena Name and Symbol SC Hearing : अखेर प्रतिक्षा संपली! शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची हे ठरणार, 'या' तारखेला होणार सुनावणी

Independence day 2025 : नेमका कितवा स्वांतत्र्यदिन, 78 वा की 79? जाणून घ्या...

Latest Marathi News Update live : नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची