Vidhansabha Election

Chetan Tupe and Prashant Jagtap's problems increased: पुण्यात आमदार चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांच्या अडचणी वाढल्या

प्रशांत जगताप आणि चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नगरसेवकांध्ये नाराजी पहायला मिळतेय.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलीये. मात्र या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी आता वाढल्याचं दिसतंय.

प्रशांत जगताप आणि चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नगरसेवकांध्ये नाराजी पहायला मिळतेय. या सर्व नाराज असणाऱ्या नगरसेवकांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विरोध होत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी वरिष्ठांना सांगून हडपसर विकास आघाडी तयार करून एक उमेदवार देणार असल्याचं सांगितलंय.

या आघाडीतून जर सर्वांनी मिळून नवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणुक ही तिहेरी होताना पहायला मिळेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा