राशी-भविष्य

Daily Horoscope 23 June Rashi Bhavishya : 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस ठरेल लाभदायक

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम करा. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today) : आज तुम्हाला तुमचे आरोग्य चांगेल राहील. तुम्हाला आर्थिक चिंता सतावेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.

कर्क (Cancer Horoscope Today) : आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आज तुम्हाला आर्थिक समस्या असण्याची शक्यता आहे. परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सिंह (Leo Horoscope Today) : शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

कन्या (Virgo Horoscope Today) : तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

तूळ (Libra Horoscope Today) : यश हातातोंडाशी येण्याची शक्यता निर्माण होईल. आर्थिक प्रश्न उभे राहतील. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.

मकर (Capricorn Horoscope Today) : तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. तुमच्या द्वारे पैसे वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. कुटुंबात काही कारणावरुन तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल.

मीन (Pisces Horoscope Today) : येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हासित राहाल. संध्याकाळी आर्थिक लाभ संभवतो. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो सावध राहा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune News : पुण्यात तब्ब्ल 5000 किलो चिकनचे वाटप; श्रावण सुरु होण्यापूर्वी आज शेवटचा रविवार

Shahrukh Khan : शाहरुख खानला 'किंग'च्या सेटवर दुखापत; काय आहे नेमकं सत्य, जाणून घ्या

Pune Crime : प्रॉपर्टीसाठी भावाने नात्याची गरिमा ओलांडली! बहिणीला दिलं वेड्याचं इंजेक्शन आणि...

Manikrao Kokate Rummy Video : रोहित पवारांच्या ट्वीटमुळे खळबळ '...कामकाज नसल्याने कोकाटेंवर रमी खेळण्याची वेळ'