मध्यप्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यामध्ये भारतीय वायुसेनेचे विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वैमानिक गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. या लढाऊ विमानाचा अपघात झाल्यानंतर हे विमान एका शेतात कोसळले. त्यानंतर या विमानाला आग लागली. या घटणेनंतर मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर दोन्ही वैमानिकांना ग्वाल्हेर येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरवर येथील दबरासानी गावामध्ये गुरुवारी दुपारी वायुसेनेचे लढाऊ विमान मिराज-2000 क्रॅश होऊन एका शेतामध्ये कोसळले. नंतर विमानाला आग लागली मात्र विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस व प्रशासन लगेचच घटनास्थळी दाखल झाले. मात्र विमानाच्या अपघाताचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. दरम्यान अपघातानंतर जखमी वैमानिकांचे काही फोटोदेखील समोर आले आहेत.
त्याचप्रमाणे विमान अपघातानंतर काही माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन वैमानिक होते. अपघाताआधी दोन्ही वैमानिकांनी स्वतः बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान आता या अपघाताचा तपास सुरू आहे.