भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस घाना देशाच्या दौऱ्यावर गेले असून त्यांना तेथील राष्ट्रपती महामा यांनी "घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान" देऊन गौरविले. यावेळी त्यांनी गॉड ऑफ ऑनरसह २१ तोफांची सलामीची दिली गेली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना सरकारचे आभार मानले. याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे.
घानाची राजधानी अक्रा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले असताना तेथे घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' देऊन त्यांना सन्मानित केले गेले .आणि २१ तोफांची सलामीही यावेळी देण्यात आली.घाना येथील पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या देशांमधून एकूण २४ पेक्षा जास्त सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत.
नरेंद्र मोदी यांचे प्रशासकीय नेतृत्व आणि जागतिक स्तरावरील नावलौकिक त्याचबरोबर जागतिक संबंध प्रस्थापित करून मजबूत करण्याच्या दृष्टीने हे सन्मान देण्यात आले आहेत. यामुळे विविध देशांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेत वाढ होत आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर या यादीमध्ये व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'या' देशांकडून मिळाले सन्मान
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक २४ पेक्षा सर्वोच्च सन्मान मिळाले असून ब्राजील, रूस, संयुक्त राज्य अमेरिका, भूटान, श्रीलंका, जापान, दक्षिण कोरिया, डोमिनिकन रिपब्लिक, पापुआ न्यू गिनी, फिजी, नाइजीरिया, ब्रुनेई, माल्टा, साइप्रस, मॉरिशस, बार्बाडोस, गुएना, ग्रीस, और ब्राज़ील या देशांव्यतिरिक्त अफगानिस्तान, सऊदी अरब, बहरीन, कुवैत, फिलिस्तीन, संयुक्त अरब अमीरात, मालदीव और मिस्र या ८ मुस्लिम देशांचा पण यात समावेश आहे.