जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यादरम्यान भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळावर हल्ला केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पाकिस्तानने दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि भारताविरोधात कुरापाती करण्यास सुरुवात केली.
पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला भारतीय सैन्याने उत्तर दिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमधील उधमपुर एअरबेस येथे सैनिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सैन्याचे कौतुक केले आहे. मोदी म्हणाले की, "भारतीय सैन्याची ताकद संपूर्ण जगाने बघितली. आपली सेना न्यूक्लियरच्या धमकीची हवा काढते. आज, या वीरांच्या भूमीतून मी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्व शूर सैनिकांना आणि बीएसएफच्या आपल्या वीरांना सलाम करतो. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजत आहे. प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञ आहे".
ऑपरेशन सिंदूर हे सामान्य नव्हते
पुढे मोदी म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर हे सामान्य नव्हते. भारत ही युद्धभूमी आहे आणि गुरु गोविंद सिंहजींचीही आहे.धर्मासाठी शस्त्रे उचलणे ही आपली परंपरा आहे. जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचे सिंदूर हिसकावून घेतले गेले, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चिरडून टाकले. ते भित्र्यासारखे लपून राहिले पण ते भारतीय सैन्याला आव्हान देत आहेत हे मात्र विसरुन गेले".
देश एकतेच्या धाग्यात बांधला गेला
पंतप्रधान म्हणाले की, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानेही पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला आहे. तुम्ही पाकिस्तानी सैन्याला असेही सांगितले आहे की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे दहशतवादी बसून शांततेत श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून तुला मारून टाकू. ते सूड घेण्याची संधीही देत नाहीत. आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्रे, त्यांचा विचार करून पाकिस्तान बरेच दिवस झोपू शकणार नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तुम्ही देशाचे मनोबल वाढवले आहे. देश एकतेच्या धाग्यात बांधला गेला आहे. तुम्ही भारताच्या सीमांचे रक्षण केले आहे. यामुळे भारताची मान उंचावली".
प्रत्येक क्षण भारतीय सैन्याच्या ताकदीची साक्ष देतो
आमच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील खोल दहशतवादी तळांना लक्ष्य केले आणि तेही अवघ्या 20-25 मिनिटांत. लक्ष्यावर अचूक मारा करणे हे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या व्यावसायिक सैन्याद्वारेच शक्य आहे. पंतप्रधान म्हणाले की, मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही तुमच्या ध्येयांनुसार पूर्णपणे जगला आहात. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि हवाई तळ उद्ध्वस्त झालेच. तसेच त्यांचे वाईट हेतू उद्ध्वस्त झाले. ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण भारतीय सैन्याच्या ताकदीची साक्ष देतो."
नौदलाने समुद्रावर वर्चस्व गाजवले
पुढे मोदी म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण भारतीय सैन्याच्या ताकदीची साक्ष देतो. नौदलाने समुद्रावर वर्चस्व गाजवले, लष्कराने सीमा मजबूत केल्या आणि हवाई दलाने हल्ला करून बचाव केला. बीएसएफ आणि इतर दलांनीही अद्भुत क्षमता दाखवल्या आहेत".