थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vladimir Putin) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात व्लादिमीर पुतिन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यावर चर्चा करू शकतात.
4 आणि 5 डिसेंबरला पुतिन यांचा दोन दिवस भारत दौरा असणार असून दोन दिवसांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील.
तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील असे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार समजते. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादलेले असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Summery
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
4 आणि 5 डिसेंबरला पुतिन यांचा दोन दिवस भारत दौरा
भारतावर टॅरिफ लादलेले असताना पुतिन यांचा दौरा महत्त्वाचा