Admin
Admin
मनोरंजन

अभिनेता सुबोध भावेने शेअर केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील पोस्टर शेअर

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता सुबोध भावेने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सुबोध भावे हा सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतो. तो त्याच्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतो. नुकतेच सुबोधने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे पोस्टर सुबोध भावेने शेअर केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुबोधने अनेक भूमिका साकारल्या आहेत. लोकमान्य टिळक , बालगंधर्व, डॉ काशिनाथ घाणेकर आणि आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 ऑक्टोबरपासून​ संपूर्ण देशात चित्रपटगृहात हा प्रदर्शित होणार आहे. अभिजीत देशपांडेंने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. याच्याआधी याचा टीझर समोर आला होता ज्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिला होता.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सुबोध म्हणाला की, ”अखंड स्वराज्याचं स्वप्न पाहणारा तो राजा रयतेचा,मराठी रक्तासाठी लढणारा तो लेक जिजाऊचा,​गनिमाच्या चिंध्या करणारा तो चालक भवानी ​तलवारीचा,एकमेव जो छत्रपती झाला तो भक्त जगदंबेचा…”असे त्याने लिहिले आहे.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला