मनोरंजन

पाहा Video : अखेर भारती सिंहने दाखवला लाडक्या लेकाचा चेहरा

लोकप्रिय महिला कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) . भारतीने आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. 2017मध्ये भारतीचे (Bharti Singh) हर्ष लिंबाचियासोबत लग्न झाले. लग्नानंतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला.

Published by : Siddhi Naringrekar

लोकप्रिय महिला कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) . भारतीने आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. 2017मध्ये भारतीचे (Bharti Singh) हर्ष लिंबाचियासोबत लग्न झाले. लग्नानंतर पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला.

भारती सिंहचा (Bharti Singh) मुलगा कसा दिसतो. तिच्या मुलाचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली होती. मात्र ही उत्सुकता आता थांबली आहे. कारण भारतीने तिच्या मुलासोबतचा पहिला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही सांगितले आहे.

व्हिडिओ शेअर करत भारती म्हणाली की, आज तुम्ही गोला म्हणजेच माझ्या मुलाला पाहू शकणार आहात. मला याबाबत खूप मेसेज आले होते. अनेकांनी टोमणेही मारले होते. मी फार आनंदी आहे. सध्या तो झोपला आहे. त्याची तयारी झाल्यानंतर तुम्ही त्याला पाहू शकाल.यासोबतच भारती (Bharti Singh) म्हणते की, गोला अगदी त्याच्या वडिलांवर गेला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या मुलासाठी ठेवलेला पाळणा, खेळणी आणि इतर अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. भारती मुलाचे डायपर बदलतानाही पाहायला मिळत आहे.

हर्ष आणि भारतीने त्यांच्या मुलाचे नाव लक्ष ठेवलं आहे. खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने भारती आणि हर्षने मुलाचा चेहरा दाखवला आहे. यासाठी त्यांनी एक मिस्ट्री बॉक्स तयार केला आहे. त्या बॉक्सच्या मदतीने त्यांनी गोलाचा चेहरा दाखवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार अनेक नवीन संधी, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Dhairyasheel Mohite Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीची वाट कोणी लावली? विलीनीकरणावरून धैर्यशील मोहिते पाटीलांची टीका

Baramati Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा विकास कामांवर भर, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश