मनोरंजन

शाहरुखच्या समर्थनात अभिनेत्री स्वरा भास्करने ‘ही’ कविता शेअर करत दर्शवला पाठिंबा !

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि चित्रपट निर्माते नीरज घायवान यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या अटकेदरम्यान सुपरस्टार शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. लेखक अखिल कात्याल यांच्या व्हायरल कवितेद्वारे त्यांनी हे समर्थन दर्शवले आहे. दोन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर टाईमलाइनवर शाहरुख खानला टॅग करत किंग खानला समर्पित अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे. या कवितेत शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांचा उल्लेख आहे, ज्यामुळे तो बॉलिवूडचा किंग खान बनला आहे.

ही कविता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कवितेत एकीकडे शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांची स्तुती केली आहे.

'कधी तो राहुल आहे, कधी राज'

अभिनेत्री स्वरा भास्करने अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे, ज्यात लिहिलेय की, 'वह कभी राहुल है, कभी राज, कभी चार्ली तो कभी मैक्स, सुरिंदर भी वो, हैरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी, वो. अमर है, समर है, रिज़वान, रईस जहांगीर भी.' स्वरा भास्करने ही कविता तिच्या टाईमलाइनवर शाहरुख खानला हार्ट इमोजीसह टॅग करत शेअर केली.

त्याचवेळी, चित्रपट निर्माते नीरज घायवान यांनी देखील आपल्या टाईमलाइनवर शाहरुख खानला 'लव्ह यू हार्ट' कॅप्शनसह टॅग करत ही कविता शेअर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."