भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला T20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर आता तो सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नुकतेच विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यादरम्यानचा दोघांचाही व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे.
आता यासोबतच कोहली आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते त्याचा हा व्हिडिओ सतत शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट त्यांच्या पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या कॅज्युअल पोशाखात दिसले. दरम्यान, अनुष्का तिच्या लूकमध्ये काळ्या बकेट हॅटमध्ये दिसत आहे तर विराटने स्वेटशर्टवर ए अक्षर दिसत आहे.
विराट आणि अनुष्काने फोटोग्राफर्सना त्यांच्या बाळा वामिकाचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली आहे, या विनंतीचे मोठ्या प्रमाणात पालन करण्यात आले आहे. तसेच कोहली-अनुष्काने म्हटले आहे की वामिकाने सोशल मीडिया एक्सपोजरबाबत स्वतःचे निर्णय घ्यावेत आणि त्यासाठी तिला मोठे व्हावे लागेल.
अनुष्का शर्मा मोठ्या विश्रांतीनंतर आता चकदा एक्सप्रेस या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झूलन स्वामी यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.