राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा पेच अद्याप कायम असून मंगळवारी (१५जून) यावर राजभवनात फैसला होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि राज्यपाल कार्यालयादरम्यान या प्रश्नावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात देखील त्यांनी पंतप्रधानांसमोर या प्रकरणाचा उल्लेख केला होता. मात्र अद्याप राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावर राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं नाहीय.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी मागवली होती. यावरून राज्यपाल नियुक्त आमदारांची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. मंगळवारी १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर सुनावणी होणार आहे. यादी खरोखरच उपलब्ध आहे किंवा नाही? हे स्पष्ट मंगळवारी स्पष्ट होईल.