कोल्हापूरमधील गोकुळ शिरकावांमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसचनगरमधील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे हे खूप वर्षापासून राहत होते. त्याच्याकडे घराकामासाठी येणाऱ्या बाईच्या अल्पवयीन मुलाने कपाटातील बंदुक चोरून मोकळ्यात मैदानात बंदुकीतले बार उडवले होते.
सकळे यांच्याकडे ५१,४०० रुपयांची मेड इन जर्मनी ३२ बोअर आर्मिनिअस जिवंत राउंड लोड असलेली रिव्हॉलव्हर कपाटात ठेवली होती. सकळे यांनी कपाटाला लॉक न लावता बाहेर गेले होते. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने बंदुक गुपचुप खिशात ठेवली.
नंतर त्यांने भींतीवर गोळ्या झाडल्या होत्या, परंतु बाहेर स्पीकरच्या आवाजाने गोळ्याचा आवाज बाहेरपर्यत आला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना समजले नाही. नंतर तो त्याच्या अल्पवयीन मित्रासोबत बाहेर गेला होता. मोकळ्या मैदानात जाऊन त्यांने बंदुकीच्या गोळ्या उडवल्या आणि बंदुक लपवून ठेवली
पोलिसांनी अवघ्या तीन तासांत बंदुक शोधून काढली होती. पोलिसांनी बंदुक चालवता कशी येते विचारता चित्रपटामध्ये बघून शिकलो असे अल्पवयीन घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलांचे उत्तर होते. सुदैवाने मोकळ्या मैदानात बंदुकीचे बार उडवल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही, आणि अनर्थ टाळला आहे.