रायगडच्या श्रीवर्धनमधील वेळास इथं तीन तरूणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. तिघेही जवळच्याच गोंडघर गावातील रहिवासी आहेत. हे तिघेही आज सकाळी वेळास इथल्या समुद्रात पोहायला उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. स्थानिक तरूण आणि वॉटरस्पोर्टस चालकांनी मदत कार्य करून तिघांनाही बाहेर काढले. परंतु तिघेही मरण पावले होते. दुर्घटनेमुळे गोंडघर गावावर शोककळा पसरली आहे.
कराडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये हा प्रवेश होणार आहे. यनिमित्ताने उंडाळकर जोरदार शकतीप्रदर्शन करणार आहेत. उदयासिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसणार आहे.