TEJAS THACKERAY HOSPITALISED IN MUMBAI; CONDITION STABLE AT SIR HN RELIANCE HOSPITAL 
महाराष्ट्र

Tejas Thackeray: तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रिलायन्स रुगणालयात दाखल

ShivSena UBT: तेजस ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळी प्रकृती खालावल्यावर तातडीने दाखल करण्यात आले असून, विविध चाचण्या करून डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत.

तेजस ठाकरे यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत असून सद्यस्थितीत ती स्थिर आहे आणि लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपचारादरम्यान आई रश्मी ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात हजेरी लावली असून, उद्धव ठाकरे दररोज डॉक्टरांशी चर्चा करत तेजस यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत.

ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य आणि पक्षातील पदाधिकारीही तेजस यांची भेट घेऊन सदिच्छा व्यक्त करीत असून, रुग्णालय प्रशासनाने अधिकृत माहिती न देता केवळ स्थिरतेची खात्री दिली आहे. तेजस यांच्या लवकर बरे होण्यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना होत आहेत.

  • तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईत रुग्णालयात दाखल.

  • सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

  • प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती.

  • उद्धव आणि रश्मी ठाकरे रुग्णालयात उपस्थित, डॉक्टरांशी चर्चा सुरू.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा