महाराष्ट्र

Woman Naxal | 6 लाखाचे बक्षीस; महीला नक्षलीचे आत्मसमर्पण

Published by : Lokshahi News

व्यंकटेश दुदामवर | सहा लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादीने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नामे शशीकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला असे तिचे नाव आहे. तिच्यावर तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आज 6 लाख रुपये बक्षीस असलेली एक जहाल महिला नक्षलवादी नामे शशीकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला हीने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
शशीकला धानोरा तालुक्यातील मोठा झलीया येथील रहिवासी आहे. डिसेंबर 2006 रोजी टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ती सध्या टिपागड एलओएस मध्ये ए.सी. एम. पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 15, जाळपोळ 01 व इतर 04 असे एकुण 20 गुन्हे दाखल असुन शासनाने 06 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2021 सालामध्ये एकुण 39 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 4 डिव्हीसी, 02 दलम कमांडर, 03 उपकमांडर, 29 सदस्य व 01 जनमिलीशिया यांचा समावेश आहे. 

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री