थोडक्यात
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण
अंजली दमानियांची आज पत्रकार परिषद
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी कोणते खुलासे करणार?
(Anjali Damania) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण सर्व कागदपत्रे दिली आहेत, त्यासंदर्भातच आज मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी म्हटलं