थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai BJP Meeting) मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दादरमध्ये बैठक पार पडणार असून सकाळी 11 वाजता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. मुंबई भाजपचे कोअर कमटीतील सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत
पालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे. यासोबतच निवडणूक संचलन समितीवर आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत काय रणनीती ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर
मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दादरमध्ये बैठक
सकाळी 11 वाजता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत बैठक