थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आजचा सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. आज 1 डिसेंबर रात्री 10 पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यामुळे अनेक सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटची दिवशी जाहीर सभांचा धडाका असणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पाच जिल्ह्यांत झंझावाती दौरा असणार आहे. एकाच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल सात सभांमध्ये संबोधित करणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे नियोजन आहे.
त्यामुळे आता या सभांमधून मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक पक्षांनी शक्तिप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित केले आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान असणार आहे तर 3 डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांकडून सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.
Summery
नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटची दिवशी जाहीर सभांचा धडाका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाच जिल्ह्यांत झंझावाती दौरा
एकाच दिवशी फडणवीस तब्बल सात सभांमध्ये संबोधित करणार