Badlapur 
महाराष्ट्र

Badlapur : बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात राडा

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Badlapur) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर आता 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असून मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यातच आता बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून लाठी चार्ज करत गर्दी पांगवण्यात आली आहे.

भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्याने हा राडा झाला. परिसरात तणावाचा वातावरण असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • बदलापूर पोलीस ठाण्या बाहेर दोन गटात राडा

  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा

  • भाजप उमेदवार रमेश सोळसे त्यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर मोठा राडा झाला

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा