मुंबई : मुलगी-वडीलांचे नाते नेहमीच अधिक प्रेमाचे असते. याचाच अनुभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आलेला आहे. फडणवीस सहा दिवसांचा जपानचा दौरा करून मुंबईत परतले आहेत. घरी येताच त्यांची सुकन्या दिवीजाने फडणवीसांचे अनोखे स्वागत केले आहे. दिवीजाने फडणवीसांचे औक्षण करत स्वागत केले. हे पाहून फडणवीस भारावलेले दिसत होते.
दरम्यान, वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा मेट्रो -११ तसेच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी जपानने आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले असून जपानी उद्योगांना भारतात यायचे आहे. हे माझ्या जपानच्या दौऱ्याचे फलित आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.