Earthquake 
महाराष्ट्र

Earthquake : कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला; केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला.

Published by : Team Lokshahi

(Earthquake) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला. शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.9 इतकी नोंदली गेली आहे. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे बहुतांश भागात धक्के जाणवले नाहीत.

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून साधारण 41 किलोमीटर अंतरावर, वारणा खोऱ्यातील तानमळा गावाच्या पूर्वेला 10 किलोमीटर व चिपळूणच्या दक्षिणेला 11 किलोमीटरवर होता. भूकंपाची खोली 41 किलोमीटर इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोयना धरण परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र मानला जातो. या भागात वेळोवेळी लहान-मोठे धक्के जाणवत असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, 5 जानेवारी रोजीही 2.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता. सातत्याने होणाऱ्या या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी कोयना प्रकल्पावर विशेष उपकरणे बसविण्याचे काम सुरु आहे.

धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या भागात बसविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे जमिनीतील हलचालींचा तपशीलवार अभ्यास करता येणार आहे. या अभ्यासातून धरणाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यास मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Cricket New Rule : ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ नव्या नियमाची घोषणा

Indigo Airlines : मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात; सुदैवानाने कोणतीही जीवीतहानी नाही

Jyoti Chandekar Passes Away : कलाविश्वात शोककळा! 'ठरलं तर मग' मालिकेतील 'या' अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास

Dahi Handi 2025 : घाटकोपरमधील राम कदम यांच्या दहीहंडीला जान्हवी कपूरची हजेरी; हंडी फोडत घेतला उत्सवाचा आनंद; Janhvi Kapoor