थोडक्यात
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस
सलग सहाव्यांदा पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती निर्माण
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली
( Pandharpur Rain Update ) महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून सलग सहाव्यांदा पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत 80 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे. तर वीर धरणातून देखील 15 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत येत आहे. नदीकाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून चंद्रभागा नदीतील भक्त पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे.