महाराष्ट्र

सांगलीच्या कृषी प्रदर्शनात दीड टनाचा गजेंद्र रेडा, 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत असा खुराक

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली : सांगलीच्या तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा..! या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यंदाही कोरोनाचे नियम पाळून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा..!

महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसुळी गावातील विलास नाईक यांच्याकडील हा गजेंद्र रेडा आहे. या गजेंद्र चा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येत आहेत. तर, या गजेंद्र ला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आता पर्यंत गजेंद्रला कर्नाटक सह चार प्रदर्शनात मालकाने नेले होते आणि आज सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात तो आला आहे आणि खास आकर्षण बनला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या