विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.
यावर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कालपर्यंत जे EVMवर दोष द्यायचे आता वस्तुस्थितीवर आले आहेत. त्यांनी आता अभ्यास केलेला दिसतोय. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे.
यासोबतच ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. आम्ही जनतेपर्यंत गेलो. जनतेला विश्वासात घेतलं. आता महाविकास आघाडी आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे. त्यांचे व्हिजन नाही आहे. महाविकास आघाडीने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. हे चांगलं आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.