eknath shinde vs shiv sena uddhav thackeray : एकनाथ शिंदेच्या गटात आता आणखी एक नाव सामील झाले आहे. शिवसेनेच्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हेही नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे. यामुळे सामतांनीही बंडखोरी केल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाचे बळ आता वाढणार आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण हा पर्यया शिंदे गटासमोर उपलब्ध आहे. आधीच्या कायद्यात गट बनवणे शक्य होतं. मात्र आत्ताच्या कायद्यात हे शक्य नाही. हे निलंबनापासून विलीनीकरणाशिवाय वाचू शकत नाहीत. (eknath shinde vs shiv sena uddhav thackeray resign bjp president rule)
सोळा आमदारांच्या निलंबनासाठी आम्ही आग्रह धरला आहे. माझा यात मोजका रोल आहे. अस मत वकील देवदत्त सामंत यांनी व्यक्त केले आहे. मी राजकीय परिस्थितीबाबत बोलत नाही. मी कायदेशील बाबी समोर ठेवत आहे. गुवाहाटीतल्या आमदारांनी दिलेल्या नोटीसी या विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत कारण की, दिलेल्या नोटीसा त्यांनीच दिल्यात का? त्यामुळे मी हे फेटाळत आहे, असे उपाध्यक्षांनी सांगितले आहे.
शिवसेनेने 16 आमदारांच्या विरोधात पॅरा 2 (1) ए दहाव्या परिच्छेदानुसार नोटीस बजावल्या आहेत. जे पार्टी ठरवते त्यावरूनच गटनेता निवडला जातो. काल राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीत निवडून दिलेले सदस्य होते. त्या सर्वांनी निलंबन प्रक्रियेला पाठिंबा दिला असून यामध्ये राज्यपालांना कोणताही रोल नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितलंं आहे.
पक्षातील बंडखोरीविरोधात आज शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईसह पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणीदेखील बंडखोरीविरोधात आंदोलन झाले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुंबईत मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यात बंडखोरांवर निशाणा साधण्यात आला आहे.