मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये ५५ रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेच्या जन्मदिनी नागपुरात मनसेच्या पदाधिकारी यांनी गणेश टेकडीच्या गणरायाचे अभिषेक पूजन केलेत.राज ठाकरे यांनी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली असून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते...
राज ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो आणि भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी प्रार्थना करत कार्यकर्त्यांनी केक कापून तसेच 55 किलो मिठाईचे वाटप केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक केला या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना या वेळी करण्यात आलीय,,
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 55 वा वाढदिवस निमित्ताने मनसेकडून वाशिम शहरातील पदमेश्वर मंदिरात दुग्धअभिषेक सोहळा करण्यात आला,असून यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृती आणि दीर्घाआयुष्याबद्दल पदमेश्वर चरणी साकडं घालण्यात आले.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य रांगोळी १२ फुट बाय १५ फुट अशी लिटील वर्ल्ड मॉल, खारघर येथे काढण्यात आली आहे
खारघर, नवी मुंबई येथे कलाकार राज ठाकरे यांना कलेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी भव्य रांगोळी काढण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य रांगोळी १२ फूट बाय १५ फूट अशी लिटील वर्ल्ड मॉल, खारघर येथे काढण्यात आली आहे.
मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 55 किलोंचा केक आणला. राज ठाकरेंनी केक कापून मनसैनिकांचे आभार मानले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज ५५वा वाढदिवस असल्याने मनसेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आज सकाळीच राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे नवे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाबाहेर गर्दी केली होती. यावेळी मनसैनिकांकडून शिवतीर्थाबाहेर राज ठाकरेंनी शुभेच्छा स्वीकारल्या ...