सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, एक मान्य करावे लागेल. भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही. आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही काय नुसतं शिंदे साहेबांचं कौतुक करणार नाही. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्य केलं पाहिजे.
शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालं आहे. आमचे बरेच त्याच मुद्दे आहेत. पण याक्षणी आम्हाला मान्य केलं पाहिजे, की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेलं. ते नेते, ते मुख्यमंत्री त्यांनी केलेलं कष्ट हे मान्यच करावं लागेल.