महाराष्ट्र

Nawab Malik : नवाब मलिकांचे ठरलं; मलिक सत्ताधारी बाकांवर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाले. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत आणि आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले.

अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक अजित पवार गटासोबत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नवाब मलिक यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

आज नवाब मलिक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असून नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर सगळ्यात शेवटी बसले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?