(Maharashtra Weather Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई आणि मुंबई उपनगरात दमदार पावसाच्या सरी कोसळत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा आगमन केल्याने बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने चिंतेतही भर पडली आहे.