थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवशीही विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विधान भवनाच्या पायऱ्यावर गळ्यात कापसाच्या माळा घालून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकारला जाब विचारण्याचे काम विरोधी पक्षाने केलं आहे.
सत्ताधारी पक्षाला जाब विचारल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाही असा इशारा विरोधकांनी यावेळी दिला. सरकारच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
Summery
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
कर्जमाफीबाबत सरकारला विचारला जाब