महाराष्ट्र

अलमट्टी धरणाची उंची वाढवणार; राजू शेट्टी म्हणाले...

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या 519 पॉईंट 60 मीटर आहे.

उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. याविषयी बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, कर्नाटक सरकारने अलमट्टीमध्ये ते पाणी 517 किंवा 18 मीटरच्या लेव्हलला अडवून ठेवलेले असतंय, त्यांनी 19 मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी आहे. पण आता ते म्हणत आहेत की, 524पर्यंत वाढवणार म्हणजे जवळपास 5 मीटरने पुन्हा उंची वाढवणार म्हणजे याचा अर्थ जूलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडलेले पाणी आहे ते पुढे सरकायला अजून 5 मीटरचा अडथळा तयार होणार.

त्यामुळे सांगली शहर असेल, कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल हा सगळा जो भाग आहे. हा जलमय होणार आहे. केवळ शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तर त्या परिसरातला बहुसंख्य शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आता 20 दिवस पूर रेंगाळतो, जर 5 मीटरने जर उंची वाढली तर पूर 1 महिना रेंगाळणार आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली