थोडक्यात
शिवसेनेचे रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत
रवींद्र धंगेकरांनी ट्विटवरील शिवसेनेचा फोटो हटवला
'सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट'
(Ravindra Dhangekar) शिवसेनेचे रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांकडून तक्रार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
रवींद्र धंगेकरांकडून ट्विटवरील शिवसेनेचा फोटो हटवण्यात आला आहे. सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट हे लिहिलेला फोटो त्यांनी आता ठेवला आहे.