राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र विजेच्या कडकडाटासह वादळी वारे आल्याने अनेक ठिकाणच्या परिसरात घराचे नुकसान झाले, तर रोड वरती झाडे उनमळून पडली आहेत. या पावसामुळे भाजीपाला शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रासह मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे महाराष्ट्रात कोकणासह घाटमाथ्यावर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिवमध्येही ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. अंदमान-निकोबार बेटानंतर पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये मान्सूनच आगमन होणार आहे. यादरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर, मिझोराम येथे 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तावली जात आहे.