थोडक्यात
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
"मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार"
( Sanjay Raut )आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या निवडणुकांबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच भाजपने मुंबई महापालिकेवर 150 प्लसचा नारा दिला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भाजपा 150 प्लसचा नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील. असा एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आहे. मग आम्हाला सगळ्यांना राजकीय संन्यास घेऊन केदारनाथला जावं लागेल ."
"भाजपाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल हे लक्षात घ्या. याच्यामध्ये आता दुमत असण्याचे कारण नाही." असे संजय राऊत म्हणाले.