थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Santosh Deshmukh Case ) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. बीडच्या विशेष मकोका कोर्टात ही सुनावणी पार पडणार असून आजची ही 19वी सुनावणी असणार आहे.
आज सकाळी 11 वाजता न्यायालयात ही सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी
बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडणार 19वी सुनावणी
आज सकाळी 11 वाजता न्यायालयात सुनावणी